मोदींच्या पराभवासाठी आघाडीत या! – भुजबळ

Chhagan-Bhujbal

नागपूर : रायगड माझा वृत्त

‘आगामी लोकसभेची निवडणूक म्हणजे मोदी विरुद्ध संविधानाची लढाई आहे. याकरिता ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज ठाकरे यांच्याही सहकार्याची गरज आहे. त्यामुळे किती जागा मिळतील, याचा विचार करण्यापेक्षा मोदींचा पराभव हाच उद्देश ठेवून सर्वांनी आघाडीत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

अमरावती येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेतून परतल्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘गर्दी आणि दर्दी यातील फरक अनुभवाने ओळखायला येतो. मोदी सरकारच्या विरोधात किती असंतोष आणि रोष आहे हे परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून दिसत आहे. फक्त आता मतविभाजन टाळण्याची गरज आहे. त्यामुळे कोणाची किती ताकद यापेक्षा कोणाची किती मदत मिळेल याकडे आघाडी करताना लक्ष देण्याची गरज आहे.’’

मोदी यांनी मागील निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर मते मागितली होती. तेव्हा कुठेच राममंदिराचा विषय नव्हता. साडेचार वर्षांच काहीच विकास करता आला नसल्याने आता भाजपने राम मंदिराचा विषय पुन्हा उकरून काढला आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

उद्धव यांनी ठाम राहावे
आधी राम मंदिर नंतर निवडणूक या शिवसेच्या घोषणेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी आपल्या घोषणेवर कायम राहावे. शिवसेनेने आधी सरकारमधून बाहेर पडून दाखावावे.’’

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत