मोदींच्या सभा परिसरातील दुकाने बळजबरीने बंद, व्यापाऱ्यांनी नोंदवला निषेध

कल्याण : रायगड माझा ऑनलाईन 

kalyan-shop-closed

पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणला येणार म्हणून आधी लग्न सोहळ्यांना बंदी करून वऱ्हाडी मंडळींच्या आनंदावर विरजण टाकणाऱ्या प्रशासनाने मग स्मशानभूमीत मृतदेह आणण्यास बंदी आणून निर्लज्जपणाचा कळस गाठला. आता तर मोदींची सभा असलेल्या फडके मैदान परिसरातील दुकानेच पोलिसांनी बळजबरीने बंद केली आहेत.

भाजीचे स्टॉल, किराणा दुकाने, बेकारी, हॉटेल व्यवसायावर यामुळे संक्रांत आली. मोदींच्या सभेमुळे आमच्या पोटावर पाय आल्याची संतप्त भावना यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त करत पोलीस दंडेलशाहीचा निषेध केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत