मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला पसंती? योगी कि अमित शाह?

Growing rift between Narendra Modi and Amit Shah over Yogi Adityanath?

महाराष्ट्र News 24

नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये जर देशात आज निवडणुका घेतल्या गेल्या तर भाजपाच पुन्हा बहुमताने सत्तेत येईल असे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत, हे देखील समोर आले आहे. परंतू मोदींनंतर पंतप्रधान कोण? यावरही लोकांनी एका नावाला पसंती दिली आहे.

इंडिया टु़डे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२,२३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती. आता निवडणुका पार पडल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर केवळ भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा मिळू शकतात. यापैकी काँग्रेसला १९ टक्के जागांसह केवळ ५१ जागांवर समाधान मानावं लागू शकतं. तर अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदी जनतेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहायचे आहे.

सध्यातरी लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झालेले पहायचे आहेत. परंतू दुसऱ्या क्रमांकावर किंवा मोदी यांच्यानंतर कोण पंतप्रधान हवेत असे विचारल्यावर लोकांनी योगींच्या नावाला पसंती दिली आहे. योगी आदित्यनाथांना 10 टक्के लोक तर गृहमंत्री अमित शहांना 8 टक्के लोक पंतप्रधानपदी पाहू इच्छित आहेत. यावरून योगींची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत