मोदींनाही कॉल ड्रॉपचा त्रास; टेलिकॉम सचिवांना झापले

दिल्ली : रायगड माझा वृत्त 

प्रवास करताना किंवा महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलताना कॉल ड्रॉप होण्याचा त्रास फक्त भारतातील सामान्य नागरिकांनाच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही होत असल्याची बाब पुढे आली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पावलं उचलण्याचा सल्लाही नरेंद्र मोदींनी टेलिकॉम सचिवांना दिला आहे.

दिल्ली विमानतळापासून आपल्या निवासस्थानी जात असताना मोदींना अनेकदा कॉल ड्रॉपचा त्रास होतो. प्रगती कार्यक्रमाअंतर्गत टेलिकॉम मंत्रालयाच्या प्रमुख सचिवांची आणि मोदींची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत टेलिकॉम विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी ग्राहकांच्या तक्रारींची माहिती दिली असता कॉल ड्रॉपच्या समस्येकडे गांभीर्याने बघायला हवे असा सल्ला मोदींनी दिला. कॉल ड्रॉप झाल्यास संबंधित टेलिकॉम कंपनीला दंड आकारण्याच्या प्रस्तावावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

कॉल ड्रॉपच्या समस्येशिवाय सीमा भागातील नेटवर्कच्या समस्येवरही तोडगा काढायला हवा असं मत मोदींनी मांडलं. या नेटवर्क समस्येचा फायदा शत्रू घेत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. या सगळ्याच समस्यांवर टेलिकॉम कंपन्याशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान कॉल ड्रॉपची समस्या फक्त भारतापुरती मर्यादित नसून ती जागतिक आहे असं स्पष्टीकरण टेलिकॉम कंपन्यांनी दिलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत