मोदींना पुन्हा बहुमत मिळणार नाही: मेघनाद देसाई

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले नेते आहेत, पण टीमला सोबत घेऊन जाणारे नेते नाहीत. मंत्रिमंडळाच्या जोरावर देश चालवण्याऐवजी गुजरातच्या धर्तीवर नोकरशहांच्या भरवशावर सरकार चालवण्याची त्यांनी चूक केली. त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त आश्वासनंही दिली. त्यामुळे लोक नाराज असून नाराज मतदार त्यांना पुन्हा बहुमत देणार नाहीत,’ असं मत मोदींचे प्रशंसक असलेले अर्थतज्ज्ञ मेघनाद देसाई यांनी व्यक्त केलं.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत मेघनाद देसाई यांनी हे स्पष्ट केलं. ‘लोक मोदींवर नाराज आहेत. अच्छे दिन अजूनपर्यंत आली नसल्याची भावना त्यांच्यात आहे. मोदींकडे अनेक संधी होत्या. पण त्याचा त्यांनी उपयोग केला नाही,’ असं सांगतानाच ‘टीमला सोबत घेऊन न जाणं त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं,’ असं देसाई म्हणाले.

‘मोदी लोकनेते आहेत, पण टीम लीडर नाहीत. अरुण जेटली आणि सुषमा स्वराज वगळता त्यांच्या टीममध्ये कोणीही अनुभवी नाही. या उलट मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंह, शरद पवार आणि पी. चिदंबरम यांच्यासह कमीत कमी सहा अनुभवी नेते होते. विशेष म्हणजे हे सहाही लोक पंतप्रधानपदाच्या योग्यतेचे होते,’ असंही ते म्हणाले. ‘परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मतदारांकडे जावे लागेल, असं मोदींना कधी वाटलं नसेल,’ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत