मोदींना विदेशात मशिदीत जायला वेळ मिळतो पण अयोध्येसाठी वेळ मिळत नाही

प्रविण तोगडियांनी सुरू केला तोफखाना 

लखनौ :रायगड माझा

विश्‍व हिंदु परिषदेपासून विभक्त होत ज्येष्ठ हिंदुत्ववादी नेते प्रविण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद नावाने स्वतंत्र संघटना स्थापन केल्यानंतर त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की मोदींना विदेशात मशिदींमध्ये जाण्यास वेळ मिळतो पण त्यांना अयोध्येत येऊन दर्शन घेण्यास वेळ मिळत नाही. मोदी सरकारने अयोंध्येत मंदिर उभारणीसाठी कोणतीही पावले उचलली नाहीत असा आरोपही त्यांनी केला आहे.

अयोध्या, कांशी, आणि मथुरेतील मंदिरांचा विषय कायदा करून सोडवा असे मोदी सरकारला सांगण्यात आले होते. कोट्यावधी हिंदुंनी त्यांना त्यासाठीच मते दिली होती पण त्यांनी हिंदुंचा विश्‍वासघात केला आहे असे तोगडिया म्हणाले. ते म्हणाले की या विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला वेळ नसेल तर आम्ही तो मसूदा तयार करून देऊ. मी स्वत: हा मसुदा तयार करण्याच्या कामाला लागलो आहे आणि लवकरच त्याची एक प्रत आपण रामलल्लाच्या चरणावर अर्पण करू असेही त्यांनी नमूद केले.

आपली नवीन संघटना स्थापन केल्यानंतर ते आज अयोध्येकडे रवाना झाले. राम मंदिराच्या मागणीसाठी आपण लखनौ ते अयोध्या अशी यात्रा काढणार आहोत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत