मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीये : अरविंद केजरीवाल

रायगड माझा वृत्त

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या सीबीआय विरुद्ध स्थानीक पोलिसांतील संघर्षामुळे भारतीय राजकारण ढवळून निघालं आहे. केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘संविधान बचाव’ची घोषणा करीत काल रात्रीपासूनच धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.

मोदींनी लोकशाही आणि संघराज्य पद्धतीची अक्षरशः थट्टा चालवलीये. काही वर्षांपूर्वी मोदींनी अर्धसैनिक बलच्या आधारे दिल्ली सरकारच्या लाचलुचपत विरोधी पथकाचा(एसीबी) ताबा घेतला. आता मोदी आणि शाह ही जोडी देशासाठी आणि लोकशाहीसाठी धोका बनली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. अशी टीका केजरीवालांनी ट्विटरद्वारे केली आहे. तसंच, ममता बॅनर्जींशी बोलणं झालंय आणि त्यांना पाठिंबा दर्शवला असल्याचंही केजरीवालांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत