मोदीबाबूंची एक्स्पायरी डेट जवळ आलीय – ममता

रायगड माझा वृत्त

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात आज कोलकाता येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात आयोजित केलेल्या सभेत तब्बल २२ पक्षांनी हजेरी लावत विरोधकांची एकजूट दाखवली. या सभेत संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जशी औषधाची एक मुदत असते. तशीच मोदी सरकारची मुदत संपत आली आहे. मोदी सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, अशी गर्जना ममता बॅनर्जी यांनी केली. मोदी सरकारविरोधात एकवटलेल्या विरोधकांची कोलकत्यात विराट सभा झाली. तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या संयुक्त सभेत प्रमुख विरोधी नेत्यांसह माजी पंतप्रधान, तीन मुख्यमंत्री, तीन माजी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हाही सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनीच मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

तीन राज्यात भाजपच्या झालेल्या पराभवाच्या वर्मावर बोट ठेवत ममता म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात जनतेला अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे एक एक करून भाजपला सर्व राज्यातून हद्दपार करायचे आहे. भाजपला घरी बसवण्याचा निर्धार देशातील जनतेने केला आहे. तसेच रथयात्रेच्या नावाखाली राज्यात दंगली घालू देणार नाही, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिला.

मोदी सरकारने देशाला लूटण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची अंमलबजाणी राज्यांनी केली. मात्र, त्याच श्रेय मोदी घेऊ पाहत आहे. सर्व काही त्यांनीच केलं असं मोदींना वाटतय, तर मग राज्यातील सरकारांची गरजच काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सीबीआय, ईडी सारख्या संस्थाविषयी आपल्या मनात आदर आहे. पण या सरकारने त्या कशा उद््ध्वस्त केल्या हे मी ऐकल आहे. पण, देशात नवी पहाट आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे काम कराव लागेल. मोदी बाबूची एक्सपायरी डेट संपत आली आहे, असा सूचक इशारा करताना ममता म्हणाल्या, आता जर मतदारांनी भाजपला मतदान केलं, तर त्यांना बँकेतील त्यांचे पैसे सुद्धा परत मिळाणार नाही, असे त्या यावेळी म्हणाल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत