मोदी-शहांच्या पोस्टर्सचा शेतकऱ्यांकडून बुजगावणं म्हणून वापर

बंगळुरू : रायगड माझा

कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहांच्या पोस्टर्सचा वापर शेतकऱ्यांनी चक्क शेतात बुजगावणे म्हणून केल्याचे दिसून आले आहे.

मागील दोन महिन्यापुर्वी मोदी आणि शहा यांनी कर्नाटकमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या सभा झाल्या. त्यादरम्यान मोदी आणि शहा यांचे बॅनर्स, पोस्टर्स सगळीकडे झळकत होते. निवडणुका संपल्यावर हेच पोस्टर्स आता शेतात बुजगावण्याच्या जागेवर वापरले जात आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांनी राष्ट्रीय नेत्यांचे पोस्टर बुजगावण्याच्या जागेवर वापरल्याचे तेथील रहिवासी राजेश मटापाटी यांनी दिली. लोक्कावल्ली ग्राम पंचायतीचे अध्यक्ष टी. एन. शिवाकिरण यांनी असे कोणतेही बुजगावणे आपल्याला दिसले नाहीत, असं म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत