मोबाईल क्रमांक 13 अंकांचा होणार?

नवी दिल्ली:रायगड माझा 
 भारतात मोबाईल क्रमांकाबद्दल मोठा बदल होऊ शकतो. जुलै 2018 पासून मोबाईलचे क्रमांक 13 अंकांचे होण्याची शक्‍यता आहे. नवे सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना 13 अंकांचा मोबाईल क्रमांक दिला जाऊ शकतो. यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली असून सरकारने याकरता सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत.
भारतात मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या जूनपर्यंत 47.8 कोटींपर्यत पोहोचण्याची अपेक्षा आहे. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि कंटार-आयएमआरबीकडून संयुक्तपणे प्रकाशित अहवालात 2017 च्या डिसेंबरपर्यंत मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 17.22 टक्‍क्‍यांनी वाढून 45.6 कोटीपर्यंत गेल्याचे नमूद आहे. अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने मोबाईल इंटरनेट दिवसेंदिवस लोकप्रिय होतेय. शहरी भारतात मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांचे प्रमाण वार्षिक 18.64 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. शासकीय बैठकीत दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी 10 अंकांच्या पातळीत आता नवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करण्याची शक्‍यताच राहिली नसल्याची भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर 10 हून अधिक अंकांच्या मोबाईल क्रमांकांचे वाटप करावे लागण्याची गरज व्यक्त होत होती.
दूरसंचार मंत्रालयाने अशाप्रकारचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदर नोव्हेंबर 2002 मध्ये देखील देशाच्या सर्व दूरध्वनी क्रमांकांच्या प्रारंभी 2 हा आकडा जोडण्यात आला होता. ज्यामुळे सर्व दूरध्वनी क्रमांक बदलले होते. ज्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या महानगरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दूरध्वनीचे क्रमांक 7 अंकांवरून वाढत 8 अंकांचे झाले होते. तर दुसऱ्या श्रेणीतील शहरांच्या दूरध्वनीचे क्रमांक 6 वरून 7 अंकी झाले होते.
मशीन-टू-मशीन संपर्कासाठी 13 अंकांच्या मोबाईल क्रमांकांची व्यवस्था असेल असा दावा तज्ञांनी केला. याकरता सर्व नवे मोबाईल क्रमांक 13 अंकांचे असले तरीही ग्राहकांना पूर्वीप्रमाणे 10 अंकांचा मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत