मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’  चित्रपटाच्या प्रदर्शनावर  बंदी ची गृहमंत्र्यांची केंद्राकडे मागणी   

महाराष्ट्र NEWS 24
मुंबईत आझाद मैदानात हैदोस घालून महिला पोलिसांवर हल्ले केल्याचा  आरोप असलेल्या  रझा अकादमीने एका चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.  राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्या मागणीचे समर्थन करत केंद्र सरकारकडे लेखी शिफारस केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या गृहमंत्र्यांप्रमाणेच रझा अकादमीची पाठराखण करणार का ? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे  मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर अल्पसंख्यांकांच्या अनुनयाला कडवा विरोध केला. पण मुख्यमंत्रीपदाच्या नादात  उध्दव ठाकरे यांना स्वर्गीय बाळासाहेबांच्या भूमिकेचे विस्मरण झाले आहे का? असाही प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.रझा अकादमीने ‘द मेसेंजर’ या चित्रपटावर बंदीची मागणी केल्यानंतर  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. त्यांनी या मागणीला पाठिंबा देत केंद्र सरकारकडे बंदीची मागणी केली. या चित्रपटामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील असे सांगत रझा अकादमीने चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. मोर्चा दरम्यान हिंसाचार आणि पोलिसांवर अत्याचार केल्याचा रझा अकादमीवर आरोप आहे.

समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारा आणि  एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारा ‘मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’ हा चित्रपट सोशल मीडिया आणि ओव्हर द टॉप या प्लॅटफॉर्म वरून बॅन करण्या बाबतच्या  तक्रारीनुसार गृहमंत्र्यांनी  केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयास या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. 

केंद्र सरकार  याबाबत काय निर्णय घेते ? आणि   या प्रश्नावरून महाराष्ट्रात  राजकारण  सुरु होते का ? हे पहाणे आता महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत