…म्हणून मुख्यमंत्री अण्णांच्या पाया पडले; राष्ट्रवादीचा आरोप

रायगड माझा वृत्त

येत्या निवडणुकीपर्यंत काही बोलू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाया पडले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतल्यावर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अमरावती येथील परिवर्तन यात्रेसाठी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह जयंत पाटील हे रवाना झाले. यापूर्वी पाटील विमानतळावर पत्रकारांशी बोलले. ‘अण्णा हजारे यांनी येत्या निवडणुकीपर्यंत काही अडचणीचं बोलू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाया पडले आणि ९ महिन्यांची मुदत मागितली, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कितीही टीका केली तरी भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी त्यांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न करू, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत