म्हसळयातील पर्जन्यमान यंत्रणेतील नोंदीबद्दल साशंकता!

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान किमान ३३०० मि.मि. व कमाल ४५०० मि.मि. असल्याचे समजते. तालुक्यातील महसुल विभागाच्या नोंदणी प्रमाणे तालुक्यात मंडल निहाय म्हसळा व खामगांव या दोन ठिकाणी पर्जन्य मापक यंत्रे आहेत. २८ ऑगस्ट २०१८ पर्यंतचे म्हसळा येथील पावसाची नोंद ३५४२.८० मी.मी.व खामगाव येथील पावसाची नोंद ४१६५.२o मी.मी. असल्याचे सांगण्यात आले. केवळ ८- १० कि . मी . हवाई अंतर आसलेल्या या दोन ठिकाणी पडलेल्या पावसाच्या नोंदीत ६२२ मी मी .चा फरक आहे. हाच संदोष यंत्रणेतील फरक आहे. जाणकार व अनुभवी शेतकऱ्यांच्या मते तालुक्यात आजपर्यंत ४२०० मि. मि. पाऊस झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

“महाराष्ट्र शासनाचे महसुल व वन विभागाने पारित केलेल्या आदेशानुसार पर्जन्यमापक यंत्रे बसविताना ३० मीटर अंतरामध्ये झाडे किंवा इमारती नाहीत हा मुख्य निकष असताना म्हसळ्याचे पर्जन्यमापक यंत्र मंडळ आधिकाऱ्यांच्या इमारतीपासून केवळ ३ मीटर अंतरावर आहे.”

जिल्हा नियोजन व विकास परिषदेकडून “नाविन्यपुर्ण बाब” म्हणून मंडळ निहाय पर्जन्य मापक यंत्र बसविण्याचा निर्णय सन २०१३ साली झाला. त्यामध्ये म्हसळा तालुक्यातील खामगांव मंडळातील पर्जन्यमापक यंत्र कृषी चिकीत्सालय देहेन येथे व म्हसळा मंडळातील पर्जन्यमापक यंत्र मराठी शाळा येथे बसाविल्याची माहीती जिल्हाधिकारी रायगड व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे आहे. परंतु या दोनही ठिकाणच्या नोंदी महसुल विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समजते.

पावसाचे निश्चित पुर्वानुमान करता आले तर कितीतरी व्यवहारीक कामे यशस्वीपणे पार पाडता येतात. पाऊस पडण्याचा निश्चित अंदाज व आजवर झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा असतो. पावसावर पिकाची पेरणी कापणी अवलंबून असते. वैमानिक व कोळ्याना सुध्दा या गोष्टीची माहीती होणे आवश्यक वाटते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत