म्हसळयात आरोग्याचा बोजवारा, म्हसळा आणि मेंदडी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत!

  • ३८ गावांतील ३२ हजार ७०५ नागरीक आरोग्य सेवेपासून वंचित

  • म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओ.पी.डी. देखील बंद 

 म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यात एक ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालय, म्हसळा, मेंदडी व खामगाव अशी तीन प्रा.आ. केंद्र आणि पाभरे येथे एक जि.प. दवाखाना व  तालुक्यात नेवरूळ , जांभूळ, तळवडे, मेंदडी, वारळ, खरसई, खामगांव,वावे व आंबेत आशी ९ उपकेंद्र आसा आरोग्याचा डोलारा आहे पण तो पोकळ आसल्याची नागरीकांत चर्चा आहे. या पाच दवाखान्या साठी शासनाच्या संकेता नुसार १२ डॉक्टर लागतात त्यापैकी केवळ ४ डॉक्टर कार्यरत आहेत उर्वरीत पदे रिक्त आहेत.ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकासह अन्य दोन वैद्यकिय आधिकारी, म्हसळा व मेंदडी येथील प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी असे ८ डॉक्टरच नसल्यामुळे तालुक्यात आरोग्याचा पुरता बोजवारा वाजला आहे.
त्यामुळे तालुक्यातील जनतेला असेल त्या दर्जाची व महागडी खाजगी आरोग्य सेवा घ्यावी लागते. या सर्व प्रकारामुळे म्हसळा प्रा.आ. केंद्राअंर्तगत म्हसळा शहर वगळता  येणारी सुमारे १७ हजार लोकसंखेची २२ गावांतील नागरीक  व मेंदडी  प्रा. आ. केंद्रातील १६ गावातीत १५ हजार २०७ नागरीक शासकीय आरोग्य सेवेपासून वंचीत आहेत. शासनाच्या ढीसाळ कारभारामुळे डॉक्टर एक तर पदे ५ ही आरोग्याची स्थिती आहे .
प्रा.आ. केंद्र बोर्लीपंचतन येथील मेडीकल ऑफिसरकडे श्रीवर्धन तालुका आरोग्य आधिकारी, म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय आधिकारी म्हसळा, वैद्यकीय आधिकारी मेंदडी असे एकूण पाच ठिकाणचे काम केले जाते. ह्या सावळ्या गोंधळाकडे शासनाचे  व स्थानिक लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्यामुळे रुग्णांमध्ये प्रशासना विरोधात नाराजी पसरत चालली आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत