म्हसळयात खैरची चोरटी वहातुक : टेंपोसह खैर जप्त

( म्हसळा प्रतिनिधी )

 

म्हसळा तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती आहे . त्यामध्ये राखीव वन व खाजगी वन अशी विभागणी होत असते.तालुक्यातून खाजगी वनांतुन खैराची चोरटी वाहतुक होत असल्याची खबर मिळाल्याने वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यानी सापळा रचून आंबेत येथे एक टेंपो खैराची चोरटी वाहतुक करताना रंगेहाथ पकडला. गुरनं १ / २०१७-१८ , भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ व ४१, महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम 3१ व ८२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आसल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी व्हि.एन्.पोवळे यानी सांगीतले. यामध्ये टाटा झेनॉन कंपनीचा टेंपो १४५ नग खैराचे साले काढलेले ०.७१६ घ.मी. अंदाजे किमत रु १ ७,९०० चे ओंडके जप्त केले. सदर माल म्हसळा तालुक्यातून रत्नागीरी तालुक्यातील मंडणगड येथे नेण्यात येत होता. वाहतुक करणारे महेश यशवंत कासारे रा.गोवळ ता. मंडणगड याना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परिक्षेत्र वन अधिकारी व्हि.एन्.पोवळे यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या या कारवाई मध्ये आंबेत चेक पोस्ट वरील पोलीस कर्मचारी व वनपाल एस्.एस्.चव्हाण, एस्.जी. म्हात्रे, वनरक्षक अतुल पवार, बनसोडे यांचा सक्रीय सहभाग होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत