म्हसळयात सरकारी कर्मचारी संपावर, सरकारी कार्यालयीन कामकाज ठप्प!

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यात सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना आपल्या विविध मागण्या मान्य होण्यासाठी ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने आज म्हसळा तालुक्यात सरकारी कर्मचारी संप १०० % यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्याने नागरीकांचे प्रचंड हाल झाले.

आज विविध कर्मचारी संघटनानी तहसील कार्यालयावर मोर्चाने एकत्रित येऊन आपल्या मागण्या मान्य होई पर्यंत संप यशस्वी करायचा असा ठोस निर्णय घेतला. मोर्चाचे नेतृत्व राज्याचे मध्यवर्ती कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण, सचिव जितेंद्र टेंबे, उपाध्यक्ष बाळकृष्ण गोरनाक, रायगड जिल्हा उपाध्यक्ष संतोष तावडे, गोविंदराव चाटे, नितीन माळी यानी केले होते. या वेळी महसुल, वन, जिल्हा परीषद व पंचायत समिती, भूमी अभिलेख, ग्रा.पा. पुरवठा आशा विविध खात्यांचे १५o कर्मचारी मोर्चात सहभागी होते.

सातवा वेतन आयोग आणि महगाई भत्याबाबत माराव्यांप्रमाणे सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने संपाची भूमिका ठाम आहे. – संजय चव्हाण  म्हसळा तालुका मध्यवर्ती कर्मचारी संघ.

 संपात सहभागी होणे ही गैरवर्तणूक मानली जाईल आणि त्या नुसार कारवाई केली जाईल अशा इशाऱ्याची नोटीस संपकरी कर्मचाऱ्याना दिली आसल्याचे महसुल प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत