म्हसळा तहसीलदारपदी शरद गोसावी यांची नियुक्ती

अनधिकृत गौण खनीज उत्खननाला कर्दनकाळ म्हणून गोसावी सिंधुदुर्गात प्रसिद्ध.

म्हसळा : निकेश कोकचा

लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यांत ३ वर्षे किंवा जास्त कालावधीत काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निकषा प्रमाणे  म्हसळा तहसीलदार रामदास झळके यांची बदली वैभववाडी जि. सिंधुदुर्ग येथे तर म्हसळा तहसीलदारपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वेंगुर्ला तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले शरद गोसावी यांची म्हसळा तहसीलदारपदी नियुक्ती झाली  आहे. लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने झालेल्या या बदल्याना विशेष गांभीर्य आहे. अनधिकृत गौण खनीज , रेती उत्खननाला कर्दनकाळ म्हणून गोसावी यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलबाला आहे. त्यानी वेंगुर्ला तालुक्यातील चिपी, कालवण व कोरजाई येथील बेकायदेशीर  रेती डेपो उध्वस्त केले होते, तालुक्यातील कर्ली खाडी पात्रात रेती उपसा करणाऱ्या ४ होडया पाण्यात बुडविल्या व २ होडया चक्क जाळल्या होत्या. महाराष्ट्र शासनाचे ५० कोटी वृक्ष लागवड कामकाजात वेंगुर्ला तालुक्यात सर्व खात्यांजवळ समन्वय साधत प्रशंसनीय काम केले होते.गोसावी हे मूळचे मालवणचे असून त्यांची बहुतांश सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील  अन्य ६ तहसीलदारांची बदली झाली आहे पेणचे अजय पाटणे, सुधागड पालीचे बाबूराव निंबाळकर, मुरुडचे उमेश पाटील, पोलादपूरचे शिवाजी जाधव, अलिबाग (संगायो) प्राजक्ता घोरपडे, पनवेलचे दिपक आकडे यांच्या बदल्या झाल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत