म्हसळा तालुक्यातील क्षत्रिय मराठा समाजाची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

श्रीवर्धन म्हसळा  तालुक्यातील अखंड मराठा समाजाचा  वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच  श्रीवर्धन शहराच्या प्रवेशद्वारा लगत एस टी स्टँड समोर असेलला मराठा भवन येथे  संपन्न झाली या वेळी व्यासपीठावर मराठा समाजाचे अध्यक्ष वसंत यादव उप अध्यक्ष दत्ताराम सुर्वे मुंबई मराठा समाजाचे अध्यक्ष किशोर राऊत,सेक्रेटरी धोंडु पवार,सुनील ठाकुर,सुजीत तांदलेकर,अनिल पवार, प्रशांत शिंदे,श्रीधर शेलार,अशोक सावंत,समीर बणकर,शिवाजी पवार,प्रदीप कदम, व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रथम सन २०१६ ते २०१७ वार्षिक अहवाल सर्व समाज बांधवासमोर सादर करण्यात आला तर  त्या संदर्भात उपस्थित समाज बांधवाना त्या संदर्भाततील माहिती अध्यक्ष यांनी दिली.त्या वेळेस मराठा समाजातील मुलांनी शैक्षनिक दर्जात मोठ्या संख्येने सहभाग घेण्यासाठी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एक शिक्षण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव उपस्थित सभागृहात अध्यक्ष वसंत यादव यांनी उपस्थित केला.या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल मराठा समाजाचे अध्यक्ष व्ही.टी.देशमुख व रायगड जिल्हा मराठा समाजाची महिला अध्यक्षा आमरे यांनी यथोचित मार्गदर्शन केले.

सभा खेळीमेलीच्या वातावरणात संपन्न झाली सभा संपन्न होण्यासाठी श्रीवर्धन शहरातील मराठा समाजातील लोकांनी या सभेचे आयोजन व उत्तम भोजनांची वेवस्था  केली होती.तर श्रीवर्धन म्हसला तालुक्यातील बहुतांश मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर या बाबतीत अध्यक्ष वसंत यादव यांनी उपस्थित मराठा समाज बांधवाचे शब्द सुमनाने अभिनंदन केले व सभा खेळीमेलीच्या वातावरणात संपन्न  झाल्याने सर्वाचे आभार मानून सभा संपवण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत