म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी-शिवसेना गटांमध्ये बेदम हाणामारी:महिलांचा विनयभंग :२१ जखमी: ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल:

म्हसळा – निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावामध्ये कोळी समाजात असणाऱ्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत महिलांसहित २१ जण गंभीर जखमी झाली असून,जखमींना म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी तर एकाला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेह्ण्यात आले.या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत सविस्तर वृत्त असे की,प्रशांत पायकोळी हा तरुण मासे पकडण्यासाठी खाडीमध्ये गेला असता त्याच खाडी मध्ये अजय महादेव पाटील हा देखील मासे पकडत होता.अजय पाटील याने प्रशांतला तू मला रागाने काय बगतोस बोलून दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.या शिवीगाळीचा प्रकरण गावामध्ये गेल्यानंतर त्यातील काही तरुणांनी कोयता सुरा,पाईप याच्या साह्याने हल्ल्यातून एका दंगलीमध्ये रुपांतर केले.या दंगलीमध्ये यामध्ये २१ जण जखमी झाली आहेत असून यातील ५ ते ६ जनाचे डोके हाताची बोटे आणि कानाला गंभीर दुखापत देखील झाली आहे.या हाणामारीमध्ये महिलांचा विनयभंग देखील झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.मेंदडी गावामध्ये राष्ट्रवादी आणि सेना या दोन गटांमध्ये आरोप प्रत्यारोप करून नेहमी वाद होत असतात.याआधी देखील गावकीचा घंटा चोरीला गेल्यामुळे या दोन गटांमध्ये दंगल होऊन गुन्हा दाखल झाला होता.सदर प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात ३५ जणांवर परस्पर विरोधी भा.द.वी कलम १४३,१४७,१४८,३५४,४२७,जमावबंद कायदा ३७,१,३ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत