म्हसळा तालुक्यात साकारतोय ग्रामनंदनवन प्रकल्प, रोजगाराची सुवर्ण संधी

माणगांव : प्रविण गोरेगांवकर

रायगडसह संपुर्ण कोकणात अनेक उच्चशिक्षित तरुणतरुणी बेरोजगार आहेत. कोणताही छोटासा व्यवसाय सुरु करायचे ठरवलाच आर्थिक अडचणीसह  अनेक लहान मोठया समस्येला  तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीमध्ये  ग्रामलक्ष्मी उद्योग समुहाचे  म्हसळा तालुक्यातील सोनघर येथे होत असलेला ग्राम नंदनवन  प्रकल्प हा नविन रोजगाराच्या संधी घेवून येत असल्याने स्थानिकांसह संपुर्ण कोकणवासियांच्या आशाआकांक्षांना पालवी फुटली आहे.

सोनघर पो. खामगांव, ता. म्हसळा येथे सन 2012 साली पाच ध्येय वेडया तरुणांनी एकत्रीत येत ग्राम लक्ष्मी  या  उद्योग समूहाची मुहर्तमेढ रोवली.  आणि कोकणातील  तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामविकासाची नवीन चळवळ उभी राहिली.  कमीतकमी जागेमध्ये कमीतकमी गंतवणुक करुन बहुस्तरीय शेतीउत्पादनासह मुक्त संचार पध्दतीने अंडी उत्पादन करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दीष्ट आहे.  यासाठी प्रबळ इच्छा शक्ती, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व सातत्याने  नाविन्याचा ध्यास त्याबरोबरच प्रयत्नाची पराकष्टा यामुळे तब्बल 6 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सोनघरमध्ये ग्रामनंदनवन प्रकल्प सज्ज झाला आहे. या प्रकल्पा  अंतर्गत शेती उत्पादनासह  प्रशिक्षण व मार्गदर्शन योग्य जातीचा पक्षी पुरवठा, नियमित खाद्य पुरवठा, औषधोपचार, लसीकरण, यांच्या प्रशिक्षणाबरोबरच होणा-या उत्पादनाच्या खरेदीची देखील हमी देण्यात आली आहे.

सोनघर गांवचे सुपूत्र विलास पारावे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या  ग्राम नंदनवन  या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा जाहीर उद्घघाटन सोहळा लवकरच 2 सप्टेबर 2018 रोजी  मुंबई येथील साहित्य संधू ‍गिरगाव येथे होत आहे. या उद्घाघाटन सोहळयाला नामवंत उद्योजक प्रशासकीय अधिकारी बँक ‍अधिकारी इ. उपस्थित राहणार असून कोकणातील जास्तीत जास्त तरुणांनी  याचा लाभ घ्यावा असे आवाहन विवेक खापरे, श्रीकांत भावे, सुधीर चिविलकर, उदय कठे यांनी केले आहे.

शेयर करा

2 thoughts on “म्हसळा तालुक्यात साकारतोय ग्रामनंदनवन प्रकल्प, रोजगाराची सुवर्ण संधी

  1. आपल्या मराठी तरुणांना उद्योगी बनविण्याचा प्रयत्नांना माझ्या हार्दिक शुभेछा. आपण आपल्या जिल्ह्यातील प्रगती नंतर महाराष्टातील इतर अधिवा सी व मागासलेल्या जिल्यात मिळून प्रयत्न करु या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.