म्हसळा : नेवरूळ ग्रामपंचायतीवर सेनेची एकहाती सत्ता

म्हसळा : निकेश कोकचा 

म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकामध्ये संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या नेवरूळ   ग्रामपंचायतीवर शिवसेनेने बाजी मारली आहे. नेवरूळ ग्रा.पं वरती सेनेचा भगवा फडकवण्यासाठी  सर्व शिवसैनिक झटत होते, मात्र यामध्ये विभाग प्रमुख सुनिल दिवेकर यांचा देखील मोलाचा वाटा आहे. सुनिल दिवेकर जे बोलतात ते करुण दाखवतात. नेवरुळ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यातून खेचून आणण्यास दिवेकर यांचा मोलाचा वाटा असल्याचे वक्तव्य नेवरूळ ग्रा.पंच्या नवनिर्वाचित सरपंच आर्या महागावकर यांनी उपसरपंच निवड कार्यक्रमाप्रसंगी काढले.
यावेळी ग्रा.पंच्या उपसरपंचपदी नामदेव महाडीक यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य  श्री.स्वप्नील लाड,श्रीम.रुक्मिणी लाड,श्रीम.राजेश्री लाड  श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक रवींद्र लाड,म्हसळा शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिर्के,शिवसेना वरवठणे गण विभाग प्रमुख सुनील दिवेकर,म्हसळा तालुका संघटक बाळा म्हात्रे,गणेश वाजे,बबन वाजे,म्हसळा काँग्रेस अध्यक्ष डॉ.मुईज शेख,म्हसळा युवासेना अधिकारी अमित महामुनकर, दीपल शिर्के,गणेश हेंगिष्टे,शिवसेना महिला संघटक रिमा महामुनकर,प्रसन्न निजामपूरकर,हे उपस्थित होते.
शाखा प्रमुख श्री.अक्षय महागावकर व उपशाखा प्रमुख स्थानिक नितीन रिकामे यांनी ग्रामपंचायत निवडून आणण्याकरिता कष्ट घेतले. सल्लागार शंकर कासार, शाखाप्रमुख मुंबई नयन  कासार,रत्नाकर लाड,प्रवीण लटके,प्रमोद गायकर,सुनील काते, जितेंद्र रिकामे,संजय लटके,सुशांत लाड,पांडुरंग खेडेकर,काशिनाथ लाड,रामजी लटके,संतोष लाड,श्रीधर काते, तुषार रिकामे,अरविंद रिकामे,रामजी काते,रमेश काते,शिवा लाड,शांताराम बिरवाडकर,सागर दिवेकर,अभिषेक कासार,अजिंक्य कासार,रामदास महाडिक,शांताराम लाड,मयूर रिकामे,मनोज रिकामे,महेंद्र महाडिक,अशोक लाड,अविनाश कासार,अनंत रिकामे,राजू बिरवाडकर,सुरज महाडिक,बंटी रिकामे,प्रणित काते,शैलेश गायकर,रुपेश पगार,व नेवरूळ गावातील व मुंबईस्थित सर्व युवा सैनिक या सर्वांनी खूपच मेहनत घेतली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत