म्हसळा पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या छाया म्हात्रे बिनविरोध!

म्हसळा : निकेश कोकचा 

आपल्या सव्वा वर्षांचा यशस्वी कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे म्हसळा पंचायत समिती सभापती उज्वला सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या पदासाठी आज दिनांक 10 ऑगस्ट 2018 रोजी निवडणूक झाली. पंचायत समिती मेंदडी समिती गणातुन निवडून आलेल्या छाया लहू म्हात्रे यांचा यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे सभापती म्हणून छाया लहू म्हात्रे यांची निवड झाल्याचे पिठासन  उपविभागीय प्रांत अधिकारी प्रविण पवार,तहसिलदार रामदास झळके,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी जाहीर केले.

या प्रसंगी आम.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते अलिशेठ कौचाली,म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष समिर बनकर, मावळत्या सभापती  उज्वला सावंत,उपसभापती संदीप चाचले, माजी उपसभापती मधुकर गायकर,जि. प.सदस्या धनश्री पाटील,व्यंकटेश सावंत,माजी जि. प.सदस्या वैशाली सावंत प्रकाश नाक्ती,किरण पालांडे,  रियाज भाई फकी,  अनिल बसवत,श्रीपत धोकटे, माजी सभापती अनिता खडस,दिलीप कांबळे आदि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला राष्ट्रीय नेते सुनिल तटकरे नेहमीच योग्य न्याय देतात. लहू म्हात्रे यांच्या सारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पक्षावरील निष्ठेमुळेच सुनिल तटकरे यांनी विश्वास टाकून तालुक्याचा प्रथम नागरिक बनण्यासाठी विश्वास टाकला. ज्याप्रमाणे सुनिल तटकरे यांनी राजकारणात सर्वोच्च उंची गाठली तसेच काम या तालुक्याचे पदाधिकारी, कार्यकर्ता यांना विश्वासात घेऊन नवनिर्वाचित सभापती छाया म्हात्रे करतील असा विश्वास आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला.
निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून सुनिल तटकरे यांना खासदार बनविण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.नवनिर्वाचित सभापती छाया म्हात्रे त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस सुनिल तटकरे,आम.अनिकेत तटकरे,जिल्हाध्यक्षा आदिती ताई तटकरे यांच्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य एका गरिब कुटुंबातील शेतकर्याच्या मुलीला या पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली असून मी त्यांची अत्यंत ऋणी असल्याचे सांगितले.
मला सुनिल तटकरे यांनी दिलेल्या या संधीचा फायदा तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत  पोचवेन आणि प्रत्येकाला विश्वासात घेऊनच तालुक्याचे कामकाज पारदर्शक पणे सांभाळून सुनिल तटकरे,आम.अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा आदितीताई तटकरे यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावीन.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत