म्हसळा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष युवा पत्रकार कै.अमोल अनंत जंगम यांच्या द्वीतीय स्मृतीदिनानिमित्ताने म्हसळ्यातील ग्रामीण रुग्णालयात मित्र परिवारातर्फे फळवाटपाचे आयोजन

म्हसळा : अमूलकुमार जैन

म्हसळा तालुक्यातील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व आपल्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर पत्रकारीता क्षेत्रात येवुन अगदी अल्पावधीतच संपुर्ण रायगड जिल्ह्याचे मन जिंकणा-या व रायगड जिल्ह्यातच असंख्य मित्र जमविणा-या म्हसळा तालुक्याचे माजी अध्यक्ष तसेच युवा पत्रकार कै.अमोल जंगम यांच्या द्वीतीय पुण्यस्मृतीदिना निमित्ताने त्यांच्या मित्र परिवाराने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी ग्रामीण रुग्णाल़़यात येणा-या रुग्णास फळवाटप करण्यात आले.

2016चा रायगड प्रेस क्लबचा युवा पत्रकार पुरस्कार प्राप्तदेखील केला होता. आपल्या सख्या मित्राला आपल्यापासुन दुरावुन दोन वर्ष झाली याची कोणासही विश्वास बसत नव्हता अगदी कालच आपण भेटुन गेलो असे मत त्यांचे मित्र डॉ.प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रशांत गायकवाड व मुन्ना बारटक्के यांनी केले. कार्यक्रमास मित्र परीवारातर्फे बाबु शिर्के, गणेश बदडे.गणेश बिरवाडकर,शिर्के.प्रसाद बोर्ले,तसेच म्हसळ्यातील पत्रकार उपस्थीत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत