म्हसळा बस स्थानकातील एसटी चालकांच्या बेशिस्तपनाचा नागरिकांना त्रास :बस स्थानक गावाबाहेर नेण्याची स्थानिकांची मागणी 

( म्हसळा – निकेश कोकचा)

म्हसळा शहरात वाहतूक कोंडीच्या समस्ये बाबत कोणतेही ठोस उपाययोजना होत नसल्याने आता ही समस्या गंभीर रूप धारण करत चालली असून या समस्येत बस चालक अजून भर टाकण्याचे काम करीत आहेत.शहराच्या मध्यभागी असणाऱ्या बस स्थानकावर एसटी चालक सर्रास दोनही बाजूला आपल्या ताब्यातील एसटी बस लाऊन निघून जातात.यानंतर मागून येणारी दुसरी एसटी बस देखील रस्त्याच्या मधोमध लावली जात असल्याने शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावर नागरिकांना काहीकाळ वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.म्हसळा शहरात अरुंद रस्ते व रस्त्यालगतच बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते.खेडेगावातून येणारे नागरिक एसटी बसच्या साह्याने शहरात येत असतात.तर शहरातील नागरिक छोटासा अंतर पार करण्यासाठी देखील वाहनांचा उपयोग करत असतात.यामुळे एका दिशेला वाहन जाण्याची क्षमता असणाऱ्या शहरातील रस्त्यावर दुसऱ्या दिशेने कोणते मोठे वाहन आल्यास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.या समस्येमध्ये एसटी बस चालकांकडून अधिक प्रमाणात भर टाकण्याचे काम सुरु आहे.शहराच्या मध्यभागी असणाऱ्या बस स्थानकासमोरील अरुंद रस्त्यावर एसटी चालकांकडून सर्रास पाच ते सहा एसटी बसेस लावण्यात येतात.हे बस चालक काहीवेसेसाठी आपल्या ताब्यातील गाडी सोडून चहा पिण्यासाठी अथवा नाष्टा करण्यासाठी निघून जात असल्याने त्या परिसरात नागरिकांना मोठ्याप्रमावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.यामुळे शहरात असलेले बस स्थानक गाव बाहेर नेह्ण्याची मागणी आता पुन्हा जोर पकडू लागली आहे.

बस स्थानक गावाबाहेर नेह्ल्यास वाहतूक कोंडीपासून मिळेल सुटकारा-
म्हसळा शहरातील अरुंद रस्त्यावर वाहनांच्या अधिक वर्दळीमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.संपूर्ण दिवसात शहरातून एसटी बसेसच्या सुमारे दोनशे पन्नास पेक्षा अधिक फेर्या असून ते शहरात थांबतात.शहरातील बस स्थानक गावाबाहेर बायपास शेजारी नेह्ल्यास शहरामध्ये वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी पासून नागरिकांना सुटकारा मिळू शकतो.बस स्थानक बाहेर नेह्ल्यामुळे अनेक प्रकारचे नवीन रोजगार निर्मिती,रिक्षा चालकांना रोजगार,व गाव वाढी साठी मोठ्याप्रमाणावर मदत होऊ शकते. बस स्थानक गावाबाहेर नेह्ण्याबाबत अनेक संघटनांनी पोलीस खात्याला पत्र देखील दिले होते.मात्र गावातील काही राजकारण्यांच्या विरोधामुळे बस स्थानक जैसे थे असून गावाच्या विकासाला बाधा बनत आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत