म्हसळा बाजारपेठेतील चार दुकानांना भीषण आग; अंदाजे ४ लाखांचे नुकसान

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असणाऱ्या चार दुकानांना मंगळवार दि. ५ फेबृ. रोजी पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास आग लागली.आग एवढी भीषण होती की, काही वेळातच बाजारपेठेतील असणारी चार दुकाने या  आगीच्या कचाट्यात सापडून जळाली असल्याची घटना घडली आहे.

म्हसळा बाजारपेठेमध्ये नौशाद पान टपरी मध्ये  शॉक सर्किट मुळे पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. पान टपरीमध्ये असणारे सिगारेट पेटवण्याचे लायटर व लायटर चार्जर  या आगीच्या संपर्कात आल्याने या लायटरचे स्फोट होऊन आगीचा भडका वाढत गेला.आगीच्या भडक्यात नवशाद पान टपरीमधील अंदाजे १ लाखाची रोकड व  २ लाख ४४ हजार ७०० रुपयांचा माल,  नंदकुमार ढवळे यांचे टेलरच्या दुकानातील ६ हजार किंमतीचा सामान, ओमकार करंबे यांचे तंबाखू चे दुकानातील ६० हजार रुपये किमतीचा माल आणि महमद फनसे यांच्या चप्पलेच्या दुकानातील २१ हजारांचे सामान  जळाले असल्याचा पंचनामा तलाठी कैलास पाटील यांच्या कडून करण्यात आला आहे.

चारही दुकानात आग लागल्याने झालेले नुकसान ४ लाख ५० हजारांच्या आसपास असल्याचे प्राथमिक  अंदाज वर्तवण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार रामदास झळके, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नगरसेवक करण गायकवाड, व्यापारी सुरेश जैन, कांतीलाल जैन, रुपेश शिगवण आणी शहरातील नागरिकांनी  त्वरीत घटना स्थळी पोहचून मदतकार्य सुरु केले.आग विजवण्यासाठी भारत पेट्रोलियमचे मालक सईद अहमद कादरी यांनी त्वरित आपल्या पंपावरील अग्निशामक यंत्र उपलब्ध करून दिले.तर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी श्रीवर्धन नगर परिषद सोबत संपर्क साधून अग्निशामक पाण्याचा बंब बोलावून आग विजवण्याचा प्रयत्न केल्याने संपुर्ण बाजारपेठ थोडक्यासाठी बचावली आहे.

पुन्हा घडू शकते अशी घटना

म्हसळा शहरातील मुख्य बाजारपेठेत दुकानांच्या छपरावरती दुरुस्तीची परवाणगी नसल्याने छप्पर बंद करण्यासाठी प्लास्टिकचा वापर मोठया प्रमाणात केला गेला आहे. या छपराला विद्यूत तारा स्पर्श करूण गेले असल्याने तारे मधून एकाधि थिनगी जरी पडल्यास संपुर्ण बाजारपेठ खाक होऊन मोठे नुकसान होऊ शकते.

म्हसळा नगरपंचायतीला निर्णय घेण्याची गरज

म्हसळा बाजारपेठ नवाब कालीन असुन संपुर्ण बाजारपेठ जिर्ण अवस्थेत आली आहे. जोपर्यंत नविन बाजार पेठेचा आराखडा मंजुर होत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांना आपली दुकाने दुरुस्थ करण्याची बिनशर्त परवाणगी देण्याबाबतचा निर्णय म्हसळा नगरपंचायतीला घेण्याची गरज आहे. अन्यथा अशा प्रकारची घटना पुन्हा घडल्यास संपुर्ण मार्केट ( भाजी गल्ली, मिर्चि गल्ली व पान गल्ली ) जळून मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत