म्हसळा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात वृक्षरोपण समारंभ

म्हसळा : निकेश कोकचा 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बँरिस्टर ए.आर.अंतुलेसाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित म्हसळा येथील वसंतराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार 13 कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ठ डोळ्यापुढे ठेवून एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम राबविण्यात आला.त्याला प्रतिसाद देत महाविद्यालयाने राष्ट्रिय सेवा योजना विभाग (N.S.S.) विभागतर्फे हा उपक्रम राबविला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संजय बेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीचे प्रथम स्वागत करुन पर्यावर्णाचा ~हास् जर का थांबवायचा असेल तर वृक्षारोपण करणे त्याच बरोबर वृक्ष संगोपन आणि संवर्धन करणे अत्त्यावश्यक आहे.वृक्ष लागवड लागवड केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरीकाचे हे कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावण्याचे आवाहन केले.कारण माणसाच्या चुकांमुळे पर्यावरणात सातत्याने बदल घडत असतात आणि या बदलामुळे संपूर्ण जगाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात असेही यांनी सांगितले.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे आय.क्यु.ए.सी.चेअरमन प्रा.वाय.एस.बंदरकर, प्रा.डि.ए.टेकळे, ग्रंथपाल आर.एस.माशाळे, शिक्षकेत्तर कर्मचारी सुशांत शिंदे, राष्ट्रिय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी मोहन जाधव, दिपाली नाक्ति, प्राजक्ता भायदे इ.उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत