म्हसळा शहरातील भरवस्तीमध्ये दिवसाढवळ्या चोरी!

म्हसळा : निकश कोकचा 

म्हसळा शहरातील बसस्थानका पासून काही अंतरावर असणाऱ्या नवानगर पोस्ट ऑफीस परिसरातील भरवस्तीत दिवसाढवळ्या चोरांनी एका प्लॅटवर आपला हात साफ केला आहे. फ्लॅटचा कोयंडा तोडून चोरांनी आतभध्ये प्रवेश केला व सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी दु १ : ३० ते ४ .३० दरम्यान घडली.

घरफोडी मध्ये २० ग्राम बजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या,५ ग्राम वजनाचे एक सोन्याचे लॉकेट, २ जोडी पैजन व २२ हजारांची रोकड असा एकूण ६५,५०० चा ऐवज व रोकड लंपास केल्याचे फिर्यादिने सांगितले.फिर्यादी इरम मतीन काझी वय ३१ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.नं. २८ / २०१८ मध्ये भा.द.वी. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चोरी झालेला फ्लॅट हा शहरातील पोस्ट ऑफिस जवळ रहदारीच्या परिसरात आहे. याआधी देखील या परिसरात अशा प्रकारे चोऱ्या झालेल्या आहेत. आता पुन्हा त्याच परिसरात चोरी झाल्यामुळे शहरातील नागरिक व व्यापाऱ्यामध्ये भितीचे वातावरण पसरले दिसते. घरातील मंडळी बाहेर जाताच चोरांच्या टोळीला याची तत्काळ माहीती प्राप्त होते व हे चोर मोठया शिताफिने चोरी करूण पसार होतात. अशा घटने वरुण लक्षात येते की, चोर हे स्थानिक व त्याच परिसरातील आहेत व त्याना पकडण्यासाठी पोलिसांना आपली गस्त वाढवावी लागणार.

म्हसळा शहरातील नवानगर परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरांना लवकरच अटक करण्यात येईल. पुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवले जाईल. याबाबत कर्मचाऱ्यानाही दक्ष राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. – प्रविण कोल्हे स.पो.नि. म्हसळा

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत