म्हसळा शहरातील वाहतूक कोंडी दूर करा : प्रसन्ना निजामपुरकर 

वाहतूक सेनेचा पोलिसांना इशारा; तहसीलदारांनाही दिले निवेदन 

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला पोलीस प्रशासनातील निष्क्रिय कर्मचारी जबाबदार असून शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अन्यथा म्हसळा शहरात रास्ता रोको करून संपूर्ण वाहतूक जाम करू असा इशारा युवसेनेचे माजी शहर अधिकारी आणि वाहतूक संघटनेने तहसीलदार आणि म्हसळा पोलीस ठाण्याला निवेदनाद्वारे दिला आहे.
म्हसळा शहरामध्ये पोलिसांच्या नियोजना अभावी आणि बेकायदेशीर दिघी पोर्टच्या वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.सदर वाहतूक कोंडीचा फटका शहरातील नागरिकांसहीत तालुक्यातून येणाऱ्या वृद्धांना बसत आहे.म्हसळा पोलिसांनी शहरात होणारीवाहतूककोंडी बाबत योग्य निर्णय न घेतल्यास येत्या काही दिवसात शिवसेना आणि शिवसेना वाहतूक सेने मार्फत शहरातील रस्त्यावर तीव्रप्रकारचा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवसेनेचे माजी शहर अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर यांनी दिली.या आंदोलना बाबत शिवसेने तर्फे तहसीलदार आणि म्हसळा पोलिसांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना उपतालुका प्रमुख अनंत कांबळे,अवजड वाहतूक सेना अध्यक्ष शाम कांबळे,उपाध्यक्ष संतोष सुर्वे,संपर्क प्रमुख गजानन सुर्वे,माजी सह्ह्र अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर,दीपल शिर्के,उप शहर प्रमुख अक्रम साने,सरपंच अनंत कांबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत