म्हसळा शहरात राष्ट्रवादीला खिंडार!

नगरपंचायत कारभारावर नाराज कार्यकर्त्याचा राष्ट्रीय कॉग्रेसमध्ये प्रवेश

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा शहराती राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या नगरपंचायत कारभार नगरसेवकांच्या मनमानी पद्धतीत चालला आहे, यामुळे शहराच्या विकासात खुंट लागल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी आज दि ५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

प्रवेश करणाऱ्या मध्ये शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे रफीक घरटकर, अबुल हुर्जुक, मुनीर दळवी, शकील ऊकये, सलीम दळवी वसीम दळवी, शफी पेनकर, जियाद दफेदार,उमेर दफेदार, वसीम म्हसळाई, फहद दळवी, तहा घरटकर, संजय(मुन्ना) टिके, शशिकांत तांबे (सुरई), किसन कांबळे (वडवली) यांचा समावेश आहे.

यातील काही जणांनी थेट नगरपंचायतीच्या नगरसेवकांवर हम बोले सो कायदाप्रमाणे वागणे, नगरपंचायतमध्ये आलेले काम स्वता घेऊन निकृष्ट दर्जाचे बांधणे, दुसऱ्यांनी कामे घेतली तर त्यामध्ये हिस्सा ठेवणे, शहरातील कचरा व्यवस्थापणावर लोखो रुपये खर्च करूणदेखील परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र असताना हा सर्व पैसा जातो कुठे, नगरपंचायतीमध्ये असणाऱ्या नगरसेवकांच्या आड मोठ धोरणामुळे शहराचा विकास थांबला असल्याचा ठपका ठेवत या सर्वानी डॉ. मुईज शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये कॉग्रेस तर्फे कॉग्रेस तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख, युवक अध्यक्ष अकमल कादीरी, नदिम दफेदार,नाजीम चोगले, सलाम हळडे, शौकत घरटकर, सुजाउद्दीन काझी, अश्फाक काठेवाडी,शफी पेनकर, मुश्ताक दफेदार, इब्राहीम कासार,पंगलोली चे कार्यकर्ते मा. सलीम धनसे, इसाक कौचाली, मेहबूब धनसे, रजाक धनसे,वरवठणे येथून अखलाक शिरशिकर, विजय गमरे व सबा गळसुरकर व अन्य कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत