म्हसळा शहरात स्कोर्पियो गाडी पहाटेच्या वेळेस दुकानात घुसून अपघात

अपघातामध्ये दुकानाचे आणि गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान

म्हसळा : निकेश कोकचा 

म्हसळा शहरात गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एक भरधाव स्कोर्पियो रस्त्यालगत असणाऱ्या दुकानात घुसून अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघातामध्ये चालक बचावला असून दुकानाचे आणि गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

माणगावच्या दिशेने म्हसळ्याकडे येणारी स्कोर्पियो गाडी म्हसळा शहरातील पोलीस ठाण्यासमोर पहाटे दोनच्या सुमारास आल्यावर अमोल मुरकर या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गाडी थेट बीएसएनएल च्या खांबवरती चढवली.गाडीची गती अधिक असल्याने गाडी तेथे न थांबता रस्त्यालगत असणाऱ्या भैरव स्टील या भांड्याच्या दुकानात गेली. या अपघातामध्ये भैरव स्टील या दुकानाचे व स्कोर्पियो गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून अपघात पहाटे झाल्याने जीवितहानी टळली आहे. अपघाताच्या भीषण आवाजाने आजूबाजूचे सर्व नागरिक बाहेर येवून त्यांनी चालकाला गाडीबाहेर काढली.या अपघाताची म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत