म्हसळा श्रीवर्धन आगरी समाज भवनाचे केंदिय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उदघाटन

मा. सभापती महादेव पाटील यांच्या प्रयत्नामुळे इमारत उभी माजी मंत्री सुनिल तटकरेंचे गौरवास्पद

म्हसळा : निकेश कोकचा
म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे उभारण्यात आलेला म्हसळा श्रीवर्धन आगरी भवनानाचे उदघाटन केंद्रीय मंत्री ना. गिते यांच्या हस्ते जरी करण्यात आले असले तरी, प्रमुख उपस्थितीत असणारे माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी उदघाटन आधीच भाषण करून सर्व आगरी समाजाचे मण जिंकल्याचे पहावयास मिळाले.उदघाटनप्रसंगी सुनील तटकरे यांनी सर्वात जास्त निधी देऊनही त्यांचे नाव फलकावर तीन नंबरवर लावल्याने त्यांनी आयोजकांचे कानपिचक्या केल्या तर या भवनासाठी सर्वात जास्त निधी शिवसेनेने दिला आहे, असे केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी ठामपणे सांगितल्याने येथे श्रेयवादायी लढाई दिसून आली.
म्हसळा श्रीवर्धन आगरी समाज संघटनेच्या मौजे मेंदडी येथे बांधण्यात आलेल्या आगरी समाज भवनाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि 1 मार्च रोजी मेंदडी येथे करण्यात आला. या भवनाचे उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री प्रथम उपस्थित होते. या वेळी माजी मंत्री सुनील तटकरे यांनी माझे आगरी समाजावर प्रेम भरपूर आहे . यामुळे सर्वात पहिले व सर्वात जास्त निधी मी दिला असल्याचा मला अभिमान आहे.आगरी समाजानी जेव्हा जेव्हा मागणी केली त्यावेळेस त्यांना निधी उपलब्ध करुण दिला असला तरी  या पुढेही आगरी समाजाच्या भवनासाठी अनिकेत तटकरे यांच्या आमदार निधीतून 15 लाख रुपयांचा निधि देण्याची घोषणा माजी मंत्री तटकरे यांनी केली. आगरी समाजाची  उभी असलेली हि  भव्य इमारत माज़ी सभापती महादेव पाटील यांच्या प्रयत्नामुळेच उभी आहे.महादेव पाटील यांनी या इमारती साठी केलेले निस्वार्थ प्रयत्न हे जग जाहीर असून त्यांनी आणखी निधी मागितल्यास मी जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे यांच्या मार्फत देण्याचा प्रयन्त करीन असे तटकरे म्हणाले. या  कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री सुनील तटकरे यांनी अठरा गाव आगरी समाज अध्यक्ष महादेव पाटील यांच्यावर स्तुती सुमने उधळताना राष्ट्रवादीचे श्रीवर्धन तालुक्याचे नेते महमद मेमन, सभापती छाया म्हात्रे, तालुका अध्यक्ष समीर बनकर यांचासाहित अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्या कार्यक्रमानंतर उशीरा आलेले ना. गिते यांच्या हस्ते या भवनाचे उदघाटन करण्यात आले. गिते यांनी आपल्या भाषणात शिवसेनेने या भवनासाठी सर्वात जास्त निधी दिल्याची बाब उपस्थितांच्या निदर्शनात आणली . या भवनाच्या शेवटच्या टप्यांत मी निधी दिल्याने हे काम पूर्ण झाले आहे  याचा मला अभिमान असल्याचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी  याप्रसंगी सांगितले. ‘यावेळी व्यासपीठावर माणगाव येथील शिवसेना नेते राजीव साबळे, श्रीवर्धन मतदारसंघ संपर्क प्रमुख सुजित तांदलेकर, श्रीवर्धन पंस.सभापती मीना गानेकर, म्हसळा  तालुका प्रमुख नंदू शिर्के, श्रीवर्धन तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर यांचा सहित आगरी समाजाचे संपूर्ण पदाधिकारी आणीहजारो समाज बांधव उपस्थित होते. या उदघाटन प्रसंगी माजी मंत्री  सुनील तटकरे व अनंत गीते हे एकत्र एकाच व्यासपीठावर येतील अशी आशा सर्वाना होती. मात्र सुनिल तटकरे वेळेवर व ना. गिते उशीरा आल्याने हा योग टळला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत