म्हसळा : स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही, सकलप बौद्धवाडी ग्रामस्थांची अवस्था बिकट

म्हसळा : निकेश कोकचा

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्या नजीकच्या ग्रुप ग्राम पंचायत खारगाव खुर्द हद्दीतील सकलप बौद्धवाडी मधील ग्रामस्थांना पावसाळ्यात गावात कोणी व्यक्तीचा मृत्यू झाला कि, प्रश्न निर्माण होतो तो स्मशानभूमी पर्यंत जाण्याचा रस्त्याचा. पिढ्यान पिढ्या पासून सकलप बौद्धवाडी ग्रामस्थासाठी सकलप नदीच्या काठी सकलप बौद्धवाडीचे स्मशान भूमी साठी राखीव भूखंड ठेवण्यात आला आहे. पिढ्यान पिढ्या पासून या राखीव भूखंडाचा आजतागायत वापर केला जात आहे. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी प्रशासनाने भूखंड स्मशानभूमी साठी राखीव केल्यापासून त्या अगोदर पासून पायवाटेचा मार्ग करून दिला होता आणि त्याच वाटेचा वापर केला जात होता. परंतु आता काही वर्षपूर्वी सदर स्मशान भूमी कडे जाणारी पायवाट हि इतर कोणी मालकी जागेतून जात आहे. अशी चर्चा केली जात आहे व त्या मालकाने पावसाळ्यात हि स्मशान भूमीची पायवाट बंद केली आहे. त्यामुळे मयत झाल्यावर स्मशान भूमीकडे जाताना ग्रामस्थांना भयंकर त्रास होताना दिसत आहे.

शासनातर्फे गाव तिथे स्मशानभूमी व स्मशान भूमी तेथे रस्ता असे असताना आजपर्यंत या ठिकाणी पक्का रस्ता झाला नाही हे दुर्दैव आहे.. मात्र या गावात स्मशान भूमीसाठी राखीव भूखंड शासनाने दिला असताना तिथपर्यंत पोहचण्याचा कायमस्वरूपी मार्ग हि द्यायला पाहिजे हि शासनाची प्रशासनाची जबाबदारी आहे. तरीही आजतागायत सादर रस्त्याचा प्रश्न प्रशासनाकडून मार्गी लागलेला नाही.

सकलप बौद्धवाडी मध्ये २५०-३०० लोकसंख्येची वस्ती आहे. अशा प्रकांच्या मूलभूत समस्यां असतील तर विकास होणारच नाही. सकलप बौद्धवाडी ग्रामस्थ रीतसर ग्रामपंचायत मध्ये या संबंधी मागणी करून ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेचा फंड सदर रस्त्यासाठी मंजूर करून घेऊ शकतो. सकलप गावामाधून खालच्या नदीवरून म्हसळ्याकडे जाणाऱ्या मुख्य पायवाट रस्त्याला जोडून तो सुमारे १०० ते १५० मीटरचा रास्ता स्मशान भूमी कडे जाणारा कायमस्वरूप रस्ता बनविल्यास बौद्धवाडीतील लोकांची समस्यां कायमची सुटेल. या संदर्भात आतापर्यंत काहीजणांनी प्रयत्न केले मात्र त्याला यश आले नाहि. मात्र हा प्रश्न आता भाजपा मार्फत नक्की सोडविला जाईल. यासाठी भाजप सोशल मीडिया सेल चे अध्यक्ष जितेंद्र नटे हे विशेष प्रयत्न करणार असल्याची माहीती त्यानी प्रतिनिधी जवळ बोलताना दिली . त्यासंदर्भात ते मुख्यमंत्री तसेच रस्ते विभाग आणि आमदार प्रशांत ठाकूर व भाजप श्रीवर्धन मतदार संघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्याकडे लवकरच पत्रव्यवहार करणार आहेत. सनदशीर मार्गाने ते या कामासाठी लढाई लढत सकलप (बौद्धवाडी) ग्रामस्थांची समस्या कायमची सोडविणार आहेत. या कामासाठी कायदेशीर बांबीसाठ अॅड. अल्पेश शिर्के सहकार्य करणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत