म्हसळ्यातील आंबेतमध्ये राष्ट्रवादीचा तर मेंदडीमध्ये शिवसेनेचा पराभव!

जब तक सुरज चांद रहेगा अंतुले तुम्हारा नाम रहेगा… घोषणांनी म्हसळा दुमदुमले

आंबेतमध्ये राष्ट्रवादीचा तर मेंदडी मध्ये शिवसेनेचा सुपडा साफ

खारगाव खुर्द येथे सरपंच एकमतांनी विजयी 

रायगड जिल्हयातून राष्ट्रवादीला हद्दपार करणार : – नविद अंतुले

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीची मतमोजणी पुर्ण झाली असुन यापैकी तिन ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे तर दोन ग्रामपंचायतीमध्ये सेना कॉग्रेस युतीचा झेंडा फडकला आहे. संपुर्ण जिल्हया साहित कोकणाचे लक्ष लागलेल्या आंबेत ग्रामपंचायती मध्ये माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या चिरंजीव नवीद अंतुले यांनी आपले नेतृत्व सिद्ध् करित सरपंच उमेद्वारा सहीत आठ सदस्य उमेद्वारांना विजय मिळवून दिला आहे.

आंबेत येथे राष्ट्रवादी पक्षाला फक्त एकच जागा जिंकता आली. खारगाव खुर्द येथे राष्ट्रवादीचा निसटता विजय झाला असुन येथे सरपंच फक्त एक मतांनी निवडून आला आहे. तर सेनेचे पाच सदस्य विजयी झाल्याने उपसरपंच मात्र सेनेचा बसणार असल्याने ग्रामपंचायतीच्या निर्णयामध्ये मोठा विरोधाभास भविष्यात पहावयास मिळेल. मेंदडीमध्ये पंचायत समितीच्या सभापती छाया म्हात्रे यांनी आपला करिष्मा दाखवत सत्ता काबीज केली आहे. येथे सरपंचा साहित दहा उमेद्वार राष्ट्रवादीचे विजयी झाले आहेत. तर सेनेला फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले.मांदाटणे ग्रामपंचायत मध्ये सरपंच सहीत सहा जागा बिनविरोध निवडणू आल्या असून येथे तिन जागांसाठी मतदान झाले असुन येथे तिनही जागांवर राष्ट्रवादीचे उमेद्वार विजयी झाले आहेत. म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये नविद अंतुलेच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाने जबरदस्त कमबॅक केले असुन पुढील काळामध्ये कॉग्रेस राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते असे मत जाणकार वर्तवत आहेत.

आंबेत ग्रामपंचायती पासून सुनिल तटकरेच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.कॉग्रेस सेना युतीच्या माध्यमातून संपुर्ण रायगड जिल्हयातून राष्ट्रवादीला हद्दपार करुण बॅ.एआर अंतुले साहेबांना श्रद्धांजल वाहणार – नविद अंतुले ( मा. मुख्यमंत्री बॅ. अंतुलेंचे चिरंजीव)

विजयी सरपंच व पक्ष
१) आंबेत – अफरोजा नाजीम डावरे ( सेना काँग्रेस युती)
२) मेंदडी – राजेश्री रविंद्र कांबळे ( राष्ट्रवादी )
३) खारगाव खुर्द – वनिता चंद्रशेख खोत ( राष्ट्रवादी १ मतांनी विजयी )
४) कोळे – देवका गणेश जाधव ( सेना )
५) मांदाटणे – चंद्रकांत लक्षण पवार उर्फ चंदू ( राष्ट्रवादी बिनविरोध )

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत