म्हसळ्यातील सुरक्षित धबधबे पर्यटकांच्या प्रतिक्षेत! 

म्हसळा : निकेश कोकचा 

पावसाळा म्हटला की पर्यटकांच्या आनंदाची व यथेच्छ पाण्यांत डुंबण्याची पर्वणी असते. मुंबई- पुण्याच्या अर्थातच शहरांच्या जवळचे असे सर्वच पॉईंट स्थानिक प्रशासनाने व हौशी पर्यटकानी विकसीत करुन नावा रूपास आणले आहेत. आता नव्याने पर्यटक धबधबे (waterfalls) शोधत असतानाच. म्हसळे तालुक्यातील धबधबे सुद्धा पर्यटकाना खुणवू लागले आहेत.
म्हसळे तालुक्यांत देहेन, घोणसे, देवघर येथील धबधबे अत्यंत सुरक्षीत असून  सर्वच गटातील पर्यटकांना ते आकर्षित करतात. लोणेरे – गोरेगांव – म्हसळा या राज्यमार्गावर देहेन ( काळभैरव मंदिरासमोर), घोणसे आणि देवघर (अमृतेश्वर मंदीरासमोर)  दोन्ही पॉईंट दिघी – माणगांव-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर येतात. ही दोन्ही ठिकाणे नैसर्गिक देणगीचे वरदान आहेत. देवघर येथील धबधबा हा स्वयंभू अमृतेश्वर मंदीरासमोरच आहे. या धबधब्यावर शनी -रवी तालुक्यातील प्राथमिक शाळा, हायस्कुल मधील मुले- मुली मोठया संखेने मजा लुटायला येतात. या सोबतच अन्य पर्यटक या भागात यावे अशी स्थानिकांची इच्छा आहे.
देवघर येथील धबधब्यावर शाळा -कॉलेज व अन्य कुटुंब टीफीन व अल्पोपहार सोबत येत असतात. स्वयंभू अमृतेश्वराच्या सानिध्यात हा परीसर असल्याने , नैसर्गिक वातावरणात  आनंद लुटत असताना कोणतीही दुर्घटना घडत नाही असे जाणकारांचे मत आहे. । अनिल महामुनकर माजी सरपंच देवघर
म्हसळा वन विभागाने पांगळाली, व्याधेश्वर या परीसरांत लाखो रुपये गुंतविले आहेत पर्यटक मात्र शून्य, आता वन विभागाने तालुक्यांतील छोटे- मोठे धबधब्यांकडे लक्ष केंद्रीत करावे, धबधब्याच्या वरच्या बाजूने मृदसंधारण व अन्य कामे करावी व परीसर आकर्षित करावा. । महादेव पाटील माजी सभापती म्हसळा
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.