म्हसळ्यातील ५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यातील महत्वाच्या  ५ ग्रामपंचायतीचा थेट सरपंच व सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, त्यामध्ये मांदाटणे, खारगांव खुर्द, मेंदडी, कोळे व आंबेत या महत्वाच्या ५ ग्रामपंचायती आहेत, या सर्वांची मुदत ३ ते ११ फेब्रवारी २०१९ पर्यंत संपत आसल्याचे तहसीलदार रामदास झळके यानी सांगितले. 

निवडणुकीचा कार्यक्रम २७ ऑगस्ट २०१८ पासून सुरू होत आहे, बुधवार दि. ५ सप्टें. २०१८ ते मंगळवार दि. ११ सप्टें.पर्यंत अर्ज दाखल करणे, बुधवार दिं.१२ सप्टें. छाननी, शनीवार दिं .१५ सप्टें.अर्ज मागे घेणे, त्याच दिवशी चिन्ह वाटप, बुधवार दिं .२६ सप्टेंबर सकाळी ७.३० ते सायं.५.३० मतदान ( आवश्यक असल्यास), गुरुवार दिं .२७ सप्टेंबर मतमोजणी.
राज्य निवडणूक आयोगा कडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक तसेच थेट सरपंच निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचार संहीता सुरु झाली आहे, तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांना आदर्श आचार संहितेचे पालन होण्या संदर्भात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ( I) व  R. P.I. या पक्षांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
रामदास झळके, तहसीलदार, म्हसळा
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत