म्हसळ्यात अटलबिहारी वाजपीयींना श्रद्धांजली!

म्हसळा : निकेश कोकचा

माजी पंतप्रधान,भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलश दर्शन व श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात घेण्यात आली.
या प्रसंगी आम.प्रविण दरेकर,राजेश मपारा,सभापती छाया म्हात्रे,संजय कोनकर,रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक,माजी सभापती महादेव पाटील,विभागीय प्रांत अधिकारी प्रविण पवार,तहसीलदार रामदास झळके,पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे, अजय पोलेकर,हर्षदभाई नजिरी, गटविकासअधिकारी वाय.एम.प्रभे., गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, संजय जाभेकर,सरोजिनी म्हशिलकार,मंगेश म्हशिलकार,मंगेश मुंडे,प्रशांत शिंदे,गर्जा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन करडे,भाऊ गंद्रे,मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस चे जनरल सेक्रेटरी विठ्ठलराव भोसले,आर.पी. आय. अध्यक्ष राजेश तांबे,भालचंद्र करडे, प्रकाश कोठावळे आदि मान्यवर उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी स्व.वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना वाजपेयी यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचे महत्व पटवून दिले.आम.प्रविणभाऊ दरेकर यांनी श्रीवर्धन,म्हसळा,तळा, माणगाव,सुधागड,रोहा इत्यादी तालुक्यातर्फे श्रद्धांजली वाहताना स्व.अटलबिहारी वाजपेयी हे असामान्य व्यक्तिमत्व असल्याचे सांगून ते एक विचार आणि संस्कृतीचे प्रतिक असल्याचे सांगून स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थीकलशाचे आज सायंकाळी सावित्री नदीत विसर्जन करणार असल्याचे भावपूर्ण सांगितले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत