म्हसळ्यात खैराची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना अटक!

म्हसळा : निकेश कोकचा 

म्हसळ्यात फार मोठया प्रमाणांत खाजगी , सरकारी वनक्षेत्र व खाजण क्षेत्र आहे. याकडे स्थानिक वन व्यवस्थापन कमीटी व वन विभागाचे लक्ष असुनही कमी जास्त प्रमाणात वनाची तोड व चोरटी वाहतुक होत असते. नवनियुक्त वनक्षेत्रपाल निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोरेगाव मंडणगड रस्त्यावर आंबेत गावचे हद्दीत टाटा ४०७ टेंपो M. H.43 /A .D.0757 हा खैराची चोरटी वाहतुक करताना रंगेहाथ पकडला टेंपोतील तीन मजुर पकडण्यात वन विभागाला यश आले

.
वनक्षेत्रपाल निलेश पाटील, याना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवरे (वनपाल दासगांव ), एस.जी. म्हात्रे .वनपाल मांदाटणे, संजय चव्हाण, वनरक्षक आंबेत,पी.व्ही. गायकर, ( वनरक्षक दासगांव ) , व्हि.डी. पाटील , एल.एन. इंगलो, बनसोडे ( म्हसळा) यांची टीम रात्र गस्त घालत असताना. वरील वर्णनाचा ४०७ टाटा टेंपो गोरेगाव आंबेत रस्त्यावर भरधाव वेगाने जात असताना थांबविण्याचा प्रयत्न केला असता रात्र व काळोखाचा फायदा घेत टेंपो आंबेत गावांत गेला.आंधाराचा फायदा घेऊन ४०७ चा ड्रायव्हर व मुख्य आरोपी पळून गेला. परंतु टेंपोची कसुन पहाणी करता शटरमध्ये १ ) राम पांडुरंग जाधव वय ४६ २) .अंकुश भागवत कोळी वय ३४,३ ) मंगेश बाबाजी जाधव वय ३० ( सर्व रहाणार महादपोली, पो. मोरबा,ता माणगाव) हे तीन मजुर व सोलीव खैराचे रु. ५८९७ किमतीचे खैराच१० ७ सोलीव तुकडे पकडण्यात पाटील यांच्या टीमला यश आले. सदर गुन्हा ची नौद ०१/ २०१८ -१९ ने करून भारतीय वन अधि नियम १९२७ चे कलम ४१ चे उल्लघन केल्याने टेंपो व माल जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आल्याचे संजय चव्हाण वनरक्षक अंबेत यानी कळविले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत