म्हसळ्यात  ट्रेलरची विद्यूत खांबला धडक; चालकासहीत दहा गुरे थोडक्यासाठी बचावली 

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यातील मौजे मेंदडी ग्रामपंचायत हद्दीत दिघी पोर्ट येथून लोह वाहतूक करणाऱ्या  ट्रेलर चालकाला पहाटे दुलकी लागल्याने गाडीवरील ताबा सुटून अपघात झाल्याची घटना १० सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजल्याचा सुमारास घडली.

अपघातामध्ये ट्रेलर रस्त्यालगतच्या विद्यूत खांबला धडकल्याने विद्यूत खांब व ट्रेलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन चालक व रस्त्यामध्ये असणारे दहा उनाड गुरे थोडक्यासाठी बचावली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दिघी पोर्टतर्फे नियमितपणे नागरी वाहतुकीच्या रस्त्यावरुण बेकायदेशीरपणे लोह व कोळश्याची अवजड वाहतुक सुरू आहे.
शिवसेना पक्षातर्फे वारंवार अवजड वाहतुकी विरुद्ध आंदोलन करुण देखील दिघी पोर्टची वाहतुक सुरळीत सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. स्थानिक प्रशासन दिघी पोर्टच्या अवजड पाकीटांमुळे  बेकायदेशीर गाड्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची टिका शिवसेनेच्या अवजड वाहतुक सेनेचे दिपल शिर्के यांनी केली आहे. सदर अपघाताची नोंद म्हसळा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत