म्हसळ्यात शिवसेनेला धक्का : माजी उपजिल्हा प्रमुख बाळ करडे, माजी तालुकाप्रमुख समीर बनकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

म्हसळा – निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यात शिवसेनेला धक्का बसला असून,शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तथा राजीपचे माजी विरोध पक्षनेते सुभाष उर्फ बाळ करडे यांच्या सहित माजी तालुकाप्रमुख समीर बनकर यांनी आ.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.Image may contain: 18 people, people smiling, people standing and wedding
ही प्रवेशाची औपचारिकता असून अधिकृतरीत्या प्रवेश ११ मार्च रोजी ना.शरद पवार यांच्या हस्ते रोह येथे होणार असल्याचे आ.सुनील तटकरे यांनी बाळ करडे यांच्या निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होत असताना बाळ करडे आणि समीर बनकर यांच्या स्वागतासाठी युवानेते अनिकेत तटकरे,मुंबई उपाध्यक्ष दाजी विचारे,जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर,विजयराज खुळे,तालुकाध्यक्ष नाजीम हासवारे,माजी पक्षप्रतोद वैशाली सावंत,सभापती उज्वला सावंत,उपसभापती मधु गायकर,जी.प.सदस्य बबन मनवे,धनश्री पाटील,नगराध्यक्षा कविता बोरकर,उप नगराध्यक्ष नसीर दळवी,युवक अध्यक्ष संतोष पाखड,फैसल गीते,पाणीपुरवठा सभापती संजय कर्णिक,बांधकाम सभापती दिलीप कांबळे,भाई बोरकर,इरफान पेवेकर यांच्या सहित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकार, कार्यकर्ते व बाळ करडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेना म्हसळा तालुक्यात आणण्यापासून वाढवण्या पर्यत महत्वाची भूमिका बजावणारे बाळ करडे यांनी तालुका नेतृत्वावर नाराज असल्याने आणि शहराचा विकास आ.सुनील तटकरे हेच करू शकतात या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याचे स्पष्ट केले.बाळ करडे यांनी प्रवेश करण्याआधी आम,सुनील तटकरे यांच्याकडे हिंदू स्मशानभूमी दुरुस्तीसाठी निधी मिळण्याची अट घातली होती.आ.सुनील तटकरे यांनी बाळ करडे यांच्या या अटीची पूर्तता करून म्हसळा शहरात असणाऱ्या हिंदू स्मशानभूमीच्या दुरुस्ती साठी जी.प.अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या फंडातून ४० लाखाच्या निधीची शासकीय मान्यताप्राप्तीचे पत्र बाळ करडे यांच्याकडे सुपूर्द केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत