म्हसळ्यामध्ये भाज्यांच्या भावामध्ये तिनपट वाढ; गृहीणीचे बजट कोलमांडले

नववर्षाच्या सुरवातीलाच म्हसळ्यामध्ये भाज्यांच्या भावामध्ये तिन पट वाढ; गृहीणीचे बजट कोलमांडले; भेंडी, फ्लॉवर, गवार ८० रु किलो : तर टॉमेटोची ५० रु किलोने विक्री

म्हसळा : निकेश कोकचा

८४ गावाची बाजारपेठ असलेल्या म्हसळा भाजी मार्केटमध्ये नववर्षाच्या पहिल्या आठवडयात सध्या भाज्यांचे दर गगणचुंबी झाले असल्याने खेडेगांवासहीत शहरात राहणाऱ्या गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमांडले असल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. म्हसळा बाजारपेठेत ४ जानेवारी रोजी भेंडी, फ्लॉवर, गवार ८०रु किलो तर टॉमेटोला ५० रू किलोचा भाव होता. म्हसळा तालुक्याच्या हद्दीमध्ये ८४ गावाचा वेढा असुन या सर्व गावांसाठी खरेदी व विक्रीसाठी म्हसळा शहर बाजारपेठ हा एकमेव पर्याय आहे. म्हसळा बाजारपेठेचे भौगोलिक आढावा घेतला असताना, बाजारपेठेची वाढ होणे कठिण असल्याचे निदर्शनास येते. याच गोष्ठीचा फायदा घेऊन शहरातील काही व्यापारी आपल्या मर्जीप्रमाणे भाज्यांचे दर निश्चित करत असल्याचे निदर्शनात आले आहे. भाजी व्यापाऱ्यांच्या या मनमर्जी भाव वाढीमुळे  अप्रगत असणाऱ्या म्हसळा शहरासहीत तालुक्यातील ग्रहिणींचे घरातील आर्थिक बजेट कोलमांडले असल्याची स्थिती सध्या निर्मिण झाली आहे.
म्हसळा बाजारपेठेतील भाजीचे दर-
  • टॉमेटो – डिसेंबर १८  ला १५ रु किलो, जानेवारी १९ ला ५०रु किलो
  • वांगी – डिसेंबर १८ ला ३५रु किलो, जानेवारी १९ ला ६० रु किलो
  • भेंडी – डिसेंबर १८ ला ४० रु  किलो, जानेवारी १९ ला ८०रु किलो
  • फ्लॉवर – डिसेंबर १८ ला ३५ किलो, जानेवारी १९ ला ८०रु किलो
  • हिरवी मिर्ची – डिसेंबर १८ ला ४५ रु किलो, जानेवारी १९ ला ८० रु किलो
  • फळस्बी _ डिसेंबर १८ ला ७५ रु किलो, जानेवारी १९ ला १२० रु किलो
  • गवार – डिसेंबर १८ ला ६०रु किलो, जानेवारी १९ ला ९० रु किलो
  • शेकटाच्या शेंगा – डिसेंबर १८ ला २५रु किलो, जानेवारी १९ ला ८० रु किलो
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत