म्हसळ्यामध्ये माजी उप नगराध्यक्ष नासिर दळवी यांनी दहा फुटी अजगराला दिले जिवनदान

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा शहरातील नगरपंचायत विरोधी पक्षनेते शोएब हलदे यांच्या घराजवळ गुरुवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास एक १० फुटी लांब अजगर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या १०फुटी  अजगराला पकडायचा की मारायचा असा विषय तेथे जमलेल्या गार्दीमध्ये चालु होता. मात्र म्हसळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष नासिर दळवी व विरोधी पक्षनेते शोएब हलदे यांनी त्या अजगराला मोठया शिताफीने पकडला. अजगराला पकडल्यानंतर दळवी यांनी वन विभागातील कर्मचाऱ्यासोबत संपर्क साधुन वनरक्षक बी.जी सुर्यथळ, अनिल मोरे, चरण चव्हान यांच्या ताब्यात देउन त्या अजगराला जिवनदान दिले. वन विभागातील कर्मचाऱ्यांनी अजगर ताब्यात घेतल्यानंतर त्याला सरवर येथीय जंगलात सोडून देण्यात आला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत