म्हसळ्यामध्ये शिक्षकाकडून आरोग्य खात्यातील महिला कर्मचारीचा विनयभंग! 

म्हसळा : निकेश कोकचा

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थामध्ये मर्यादा पुषोत्तम रामाचे धडे शिकवण्याऐवजी म्हसळा तालुक्यातील एका शिक्षकाने चक्क रावणाचा रुप धारण करुण आरोग्य खात्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवार दि. ६ सप्टेंबर रोजी घडली आहे. या घटनेमध्ये शिक्षकाच्या वशिल्यामुळे पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून  दबावापोटी  ६ दिवस उलटूनही अद्याप कारवाई झाली नसल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरु झाली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, रा.जी.प शाळा ताम्हाणे करंबे येथे विद्यार्थ्याच्या नोंदीबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य खात्यातील एका महिला कर्मचारीला तेथील शिक्षक कमलाकर ज्ञानदेव धुळगुंडे यांनी तीच्या मनात लज्जा निर्माण होईल असे शब्द वापरले व त्याप्रमाणे वागणूकही केली.
या बाबत पिडीत महिला कर्मचाऱ्यानी म्हसळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र घटना घडून सात दिवस उलटले असताना देखील अश्लिल चाळे करणाऱ्या या  शिक्षकावर अद्याप कारवाई झाली नाही. शिक्षणाच्या नावावर कलंक असणाऱ्या  या रावणरूपी शिक्षकावर फौजदारी गुन्हा दाखल  व्हावा यासाठी तालुक्यातील प्रत्येक स्थरातून मागणी होत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत