म्हसवड येथे चोरून वाळू भरणार्‍या दोघांवर गुन्हा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

रायगड माझा वृत्त 

म्हसवड: येथील माणगंगा नदीपात्रालगत असणार्‍या स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूस विनापरवाना चोरून वाळू भरणार्‍या दोन जणांच्या विरोधात म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल करून सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष बागल   यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार येथील माणगंगा नदीपात्रालगत असणार्‍या स्मशानभूमीच्या मागे विनापरवाना वाहनांमध्ये वाळू भारत असल्याचे समजल्यानंतर पोलीस कर्मचारी संतोष बागल, काकडे, धुमाळ, जाधव हे त्या ठिकाणी गेले असता नारायण रावसाहेब माने (वय 22 व दादा धनाजी शिंदे, वय 23 दोघे रा. म्हसवड) हे टाटा कंपनीच्या 709 टेम्पोमध्ये वाळू भरत असताना आढळून आले. या दोघांच्या विरोधात म्हसवड पोलिसात फिर्याद दाखल करून टेम्पो  व त्यामधील सुमारे पाव ब्रास वाळू, असा एकूण 3 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. सपोनि. मालोजीराव देशमुख तपास करीत आहेत.

संग्रहित चित्र

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.