म्हाडाच्या एक हजार घरांची सोडत ऑगस्टमध्ये!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

दिवाळीत घर खरेदी करण्याची तयारी करत असाल तर थोडं थांबा. जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा १ हजार घरांची सोडत काढणार आहे. त्याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार असून जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

गोरेगाव, बोरिवली, विक्रोळी, मुलुंड, अॅण्टॉप हिल आणि मानखुर्द आदी ठिकाणी ही घरे उपलब्ध राहणार आहेत. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी ८०० आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी २०० घरे ठेवण्यात आली आहेत. या घरांची निश्चिती मुंबई मंडळाकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया जूनच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण करून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण १ हजार स्वस्त घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

बोरीवलीतील महावीर नगर, गोरेगाव, विक्रोळीमधील कन्नमवारनगर, घाटकोपरमधील पंतनगर, अ‍ॅण्टॉप हिल, मुलुंडमधील गव्हाणपाडा, मानखुर्द या ठिकाणी या वर्षी म्हाडाची घरे उपलब्ध असतील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत