म्हाडाच्या घरांची लॉटरी आता डिसेंबरमध्ये निघण्याची शक्यता

मुंबई : रायगड माझा वृत्त

म्हाडाच्या 1194 घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार होती. हा महिना संपत आला तरी लॉटरीची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लॉटरी यंदा भलतीच उशिरा निघणार असून त्यासाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. 2016 आणि 2017 साली म्हाडाची लॉटरी 10 ऑगस्ट आणि 10 नोव्हेंबरला निघाली होती. यंदाच्या लॉटरीसाठीची जाहिरात 5 नोव्हेंबरला निघण्याची शक्यता आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 45 दिवसांपर्यंत अर्जदारांना घरांसाठी अर्ज करता येणार आहे.

यंदाच्या लॉटरीमध्ये 90 टक्के घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील असणार आहेत. अल्प उत्पन्न गटासाठीची घरे हे मुलुंडमधल्या गवाणपाडा इथली गोरेगांवमधील सिद्धार्थनगर भागात असतील असं एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. मध्य उत्पन्न गटासाठी २१६ घरे असणार आहेत तर उच्च उत्पन्न गटासाठी फक्त २ घरे असणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत