यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) १० ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार

पुणे : रायगड माझा वृत्त 

Pune International Film Festival (PIFF) This year from 10 to 17 January | यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) १० ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार 

इफ्फीप्रमाणेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल घेण्यात आली असून, ‘इन सर्च ऑफ ट्रुथ-सेलिब्रिटिंग १५० इयर बर्थ अँनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ या संकल्पेनवर यंदाचा महोत्सव  रंगणार आहे. पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दि. १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाची चाहूल लागल्यानंतर रसिकांना वेध लागतात ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे.. महोत्सवामध्ये देशविदेशातील विविध चित्रपटांचा आस्वाद घेण्याची पर्वणी मिळत असल्याने रसिकांना महोत्सवाची उत्सुकता लागलेली असते. जागतिक स्तरावरही पिफने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याने विदेशातही महोत्सवाची चर्चा सुरू होते. यंदाच्या वर्षीही  विविध देशांकडून  महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, 114 देशांमधून १६३४  चित्रपट प्राप्त झाले आहेत.  त्यातील निवडक १५० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महात्मा गांधी यांचे योगदान केवळ स्वातंत्र्यलढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. यावर्षी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आणि तत्वज्ञानावर आधारित काही जागतिक दर्जाचे चित्रपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. याशिवाय महोत्सवात जागतिक आणि मराठी स्पर्धात्मक विभाग, माहितीपट,कं ट्री फोकस, आशियाई ,जागतिक चित्रपट, सिंहावलोकन ( रेस्ट्रोपेक्टिव्ह), भारतीय चित्रपट, आजचा मराठी चित्रपट, विशेष स्क्रिनिंग आणि कँलिडोस्कोप आदी विविध विभागामध्ये दर्जेदार, आशयसंपन्न कलाकृती पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.  या महोत्सवातील चित्रपट पाहाण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, उद्या ( 11 डिसेंबर) पासून या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीला सुरूवात होणार आहे.

पिफ च्या  ‘ट्रिब्युट’ विभागामध्ये संगीत, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांची साजरी होणार जन्मशताब्दी गदिमा, बाबुजी, पु.ल देशपांडे, उस्ताद अल्लारखॉं आणि स्नेहल भाटकर या साहित्य आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या  जन्मशताव्दीवर्षास प्रारंभ झाला आहे. पिफमध्ये चित्रपटसृष्टीसाठी योगदान दिलेल्या दिग्गजांची दखल घेतली जाणार असून,  ‘ट्रिब्युट’ विभागात त्यांनी अजरामर केलेल्या चित्रकलाकृती सादर केल्या जाणार असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत