यंदा सत्तांतर अटळ – धनंजय मुंडे

 

रायगड मझा ऑनलाईन | जळगाव

Image may contain: 1 person

विद्यमान सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली असून सर्वांमध्ये सरकारबद्दल असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. जनता या सरकारला जागा दाखविण्यासाठी आसुसलेली असून यंदा सत्तांतर अटळ असल्याचे प्रतिपादन राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. दैनिक जनशक्ति कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दैनिक जनशक्तिचे संपादक कुंदन ढाके, कार्यकारी संपादक शेखर पाटील आदी उपस्थित होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. 1994 मध्ये देखील सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. मात्र यंदा त्याही पेक्षा जास्त प्रतिसाद यावर्षीच्या हल्लाबोल मोर्चाला मिळत आहे. हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला देखील जनतेकडून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आगामी होऊ घातलेल्या निवडणूकीला जनतेसमोर ठोस असे मांडण्यासारखे या सरकारकडे काहीही नाही, त्यामुळे सत्तातंतर हे अटळ आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत