यवतमाळमध्ये भीषण अपघात ; 10 जण जागीच ठार

यवतमाळ : रायगड माझा

नागपूर-तुळजापूर महामार्गावर ट्रक आणि तवेरा गाडीचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण जागीच ठार, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पंजाबमधील नागरिकांचा समावेश असून ते सर्वजण नांदेड येथील हुजूर साहीब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी निघाले होते.

ट्रक आणि तवेरा गाडीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. अपघातामधील मृतांमध्ये चार पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.