यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ढिसाळ व्यवस्थापन!

परिक्षा केंद्र बदलल्यामुळे विदयार्थ्यांची मोठी गैरसोय

पाली : विनोद भोईर

शिक्षणापासून वंचित राहिलेले तसेच काम करणारे विदयार्थी अापले अपुर्ण शिक्षण पुर्ण करता यावे व अापल्या सोईनुसार शिक्षण घेता यावे यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात प्रवेश मिळवितातमात्र जिल्ह्यातील या विद्यापिठातील विदयार्थ्यांना नियोजीत परिक्षा केंद्र न मिळता दुरवरचे परिक्षा केंद्र मिळाल्याने मोठी गैरसोय झाली आहे.

पेण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परीक्षा केंद पेण कदम कॉलेज गर्दी

 

पाली येथील ग.बावडेर हायस्कुल मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र आहेमागील काही वर्षांपासून या केंद्रातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा येथेच होतातमात्र या वर्षी या केंद्रातील परिक्षा अचानक रद्द झाल्या अाणि येथील विदयार्थांना पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालय हे परिक्षा केंद्र मिळालेत्यामुळे या केंद्रातील साधारणतः चारशे– पाचशे विदयार्थ्यांना पेण येथे परिक्षेसाठी जावे लागत आहेया केंद्राबरोबरच इतर केंद्रावरील काही विदयार्थ्यांना देखिल त्यांच्या जवळचे परिक्षा केंद्र मिळाले नाहीदुरवरच्या परिक्षआ केंद्रावर जाण्यायेण्यातच त्यांचा खुप वेळ जातो.तसेच प्रवासाचा देखिल त्रास होत आहेकाही वेळेस वाहतुक कोंडीचा सामना देखिल करावा लागतोया विदयार्थ्यांमध्ये अनेक नोकरी धंदा करणारे विदयार्थी व महिला देखिल अाहेतपरिणामी या विदयार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे.अनेक विदयार्थ्यांनी सकाळला सांगितले कि परिक्षा केंद्र बदलणार होते याची कोणतीच कल्पना अाम्हाला मिळाली नाहीनियोजीत किंवा पुर्वीचे परिक्षा केंद्र मिळणार नसते तर अाम्ही या केंद्रावर प्रवेश घेतला नसता.

परिक्षा केंद्र निवडीचा विदयार्थ्यांना पर्याय नाही

  • जिल्ह्यात पालीनिजामपुरतळाइंदारपुर, कोलाड व पेण अादी ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची केंद्र अाहेतत्यातील कोलाड केंद्र दोन वर्षांपुर्वी बंद झाले आहे.त्यानुसार विद्यार्थ्यांनी अापल्या सोयीनुसार जवळच्या केंद्रावर प्रवेश घेतलात्यांना असे वाटले की या केंद्रावरच अापल्याला प्रवेश मिळेलमात्र तसे न होता त्यांना दुरवरचे परिक्षा केंद्र मिळाले आहेश्रीवर्धनम्हसळा अादी ठिकाणच्या विदयार्थ्यांना तर पेण येथील म्हणजे जवळपास दिडशे किमीहुन अधिक अंतरावरील परिक्षा केंद्र मिळाले आहेया सर्व विदयार्थ्यांनी विद्यापिठाच्या या कारभाराबद्दल राग व्यक्त केला अाहे.

यासंदर्भात पाली केंद्राशी संपर्क साधला असता तेथून सांगण्यात आले कि अाम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्यास सांगितले आहेहे केंद्र परिक्षा केंद्र म्हणून सुरु अथवा बंद ठेवा या संदर्भात विद्यापिठाकडून कुठलाही पत्र व्यवहार केला गेलेला नाही.

विदयार्थ्यांची कसून तपासणी : 

पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालय या परिक्षा केंद्रावर अालेल्या विदयार्थ्यांची रोज कसुन तपासणी होतेमहिला व पुरुषांची काॅपी तपासणीची दोन वेगवेगळी पथके आहेत.प्रत्येक वर्गावर हे पथक दोन तीन वेळा तपासणी करते.त्यामुळे काहीही न केलेले विदयार्थी मानसिक दडपणाखाली पेपर देतात असे अनेक विदयार्थ्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत