यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? :धनंजय मुंडेंचा टोला

मुंबई : रायगड माझा वृत्त 

आज व्हॅलेंटाइन डे असून प्रत्येकजण आपापल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. मात्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली आहे. धनंजय मुंडे यांनी दोघांचा एक फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा प्रश्न विचारत टोला मारला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का?’ ट्विटमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन डेचा हॅशटॅगही दिला आहे.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1095915028086226944

राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार आहे. मात्र सत्तेत भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेनेने नेहमीच विरोधकांची भूमिका घेतली आहे. अनेकदा विरोधी पक्ष टीका करण्याआधीच शिवसेना भाजपावर टीका करुन मोकळी होते. शिवसेनेने अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याचीही धमकी दिली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधी पक्षांनी नेहमी टीका केली असून हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा असं आव्हानही दिलं आहे. पण अद्यापही युती कायम आहे. नेमका हाच मुद्दा घेत धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजपाला टोला लगावला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत